महावितरणच्या निष्काळजीपणा ; नागरिकाचा संताप
पैठण, (प्रतिनिधी) : पैठण तालुक्याच्या हद्दीला खेटून असलेल्या शेवगाव तालुक्यातील क-हे टाकळी (ता. शेवगाव) या गावातील लू विशाल अरुण गव्हाणे (वय २२) या तरुणाचा नाथसागर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात विजेच्या तारीला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
र र T व र य क्ष फक्त मासे धरण्याचा व्यवसाय पण तोच त्याच्या आयुष्याचा शेवट ठरला. विशाल गव्हाणे हा आपल्या मित्रांसोबत मासेमारीसाठी नाथसागर जलाशय परिसरात गेला होता. मात्र पाण्यात असलेल्या विद्युत तारेला त्याचा हात लागताच विजेच्या प्रचंड झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. क्षणात सर्वकाही संपले.
त्यामुळे एका कुटुंबाचा आधार हरपला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून, महावितरणच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, क-हे टाकळी गावात वायरमन कधीच दिसत नाही. त्याची कामे खासगी इसमा कडूनच करवून घेतली जातात. वायरमन मात्र ङ्गउंटावर बसून शेळ्या राखतो ! फ अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे, कहार समाजाने महिना भरापूर्वीच महावितरण कंपनीला लेखी निवेदन देऊन धरण परिसरातील डी पी लाईन तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.
परंतु अधिकाऱ्यांनी या तक्रारी कडे दुर्लक्ष केले असल्याने विशाल अरुण गव्हाणे हा त्याच निष्काळजी पणाचा बळी ठरला आहे. विशाल हा एकुलता एक मुलगा गमावलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा तपास शेवगाव पोलीस ठाण्याचे बिट हवालदार नितीन भदाने करत आहेत. शव विच्छेदन ग्रामीण रुग्णालय, शेवगाव येथे डॉ. लोखंडे यांनी केले. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी व कहार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.










